महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र 3,07,713 चौ.कि.मी.एवढे असून त्यापैकी 50,757 चौ.कि.मी.क्षेत्र आदिवासी उपयोजनेखाली येते. याचे प्रमाण 16.5 टक्के एवढे होते. गेल्या तीन दशकांतील राज्याची लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलनात्मक आकडेवारी खाली देण्यात आली आहे. जनगणना वर्ष राज्याची एकूण लोकसंख्या (लाखांत) आदिवासी लोकसंख्या (लाखांत) टक्केवारी 1971 504.12 38.41 7.62 1981 627.84 57.72 9.19 1991 789.37 73.18 9.27 2001 968.79 85.77 8.85 2011 1123.74 105.10 9.35 1981-1991 या दशकातील राज्याची एकूण लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलना केल्यास असे दिसून येते की, आदिवासी लोकसंख्येच्या वाढीची ही टक्केवारी कमी अधिक प्रमाणात सातत्या9ने 9.00 ते 9.20 टक्के एवढी राहिलेली आहे. तथपि, 2001च्या जनगणनेनुसार प्रथमच 9.00 टक्केपेक्षा आदिवासी लोकसंख्या कमी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, मन्नेरवारलु, महादेव कोळी, ढोर कोळी-टोकरे कोळी, पावरा, ठाकूर, वारली,अंध,कोकणा-कोकणी या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्...